LOKSANDESH NEWS
स्मार्ट मीटर विरोधात वीज ग्राहकांकडून माकपची अर्ज संकलित मोहीम
सध्या महावितरण कंपनीने राज्यातील सर्व वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर्स लावणार असे जाहीर केले आहे. तसेच हे मीटर्स कंपनीच्या खर्चाने मोफत लावणार अशी फसवी व चुकीची जाहिरात केली आहे. या संबंधी निविदा मंजूर करण्यात आलेली आहेत व लवकरच सर्वत्र मीटर्स लावण्याची मोहिम सुरु होईल असे स्पष्ट दिसून येत आहे. वास्तविक हे मीटर्स मोफत लावले जाणार नाहीत. केंद्र सरकारचे अनुदान वगळता या मीटर्सचा उर्वरित सर्व खर्च वीजदर निश्चिती याचिकेद्वारे आयोगाकडे मागणी केला जाईल आणि आयोगाच्या आदेशानुसार वीजदरवाढीच्या रुपाने १ एप्रिल २०२५ पासून ग्राहकांच्या खिशातूनच वसूल केला जाईल हे निश्चित व स्पष्ट आहे.
त्यामुळे केवळ महावितरण कंपनी वा येणाऱ्या खाजगी वितरण कंपन्या वा सरकार यांच्या हितासाठी आणि खाजगीकरणाच्या वाटचालीतील पुढचा टप्पा म्हणूनच ही योजना आणलेली आहे असे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे आम्ही या स्मार्ट/प्रीपेड मीटर्सना संपूर्ण विरोध आहे.
वीज वापर करणाऱ्या हजारो ग्राहकांच्या प्रीपेड मीटर विरोधात अर्ज संकलित करण्याची मोहीम संपूर्ण शहरात राबवण्याची मोहीम हाती घेतली असून येत्या 24 एप्रिल रोजी अभूतपूर्व असा ग्राहकांचा मोर्चा वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयावर काढणार असल्याची माहिती सीटू ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर यांनी दिली.
बुधवार दिनांक 26 मार्च रोजी लष्कर भागातील कामगार चौक येथे सीटू चे राज्य महासचिव ॲड एम एच शेख यांच्या नेतृत्वाखाली प्रति, मा. अधिक्षक अभियंता, सोलापूर डिव्हिजन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांच्याकडे सादर करण्यास स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात वीज ग्राहकांकडून अर्ज संकलित करण्याची मोहीम हाती घेण्यात आली.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली