छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानदिना निमित्त सांगलीत श्री शिवप्रतिष्ठानने काढली मुकपदयात्रा
छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या ३३६ व्या बलिदान दिना निमित्त सांगलीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून मुकपदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत संभाजी भिडे यांनी सहभाग घेतला होता.
सांगलीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून महिनाभर संभाजी महाराजांचा बलिदान मास पाळला जातो. या मूक पद यात्रेत आज एक महिन्यानंतर संभाजी महाराजांची न निघालेली अंत्ययात्रा काढण्यात येते. शिवप्रतिष्ठानच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मुंडन करत, पायात चप्पल न घालता अंत्ययात्रेत सहभागी होत छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रति आपल्या भावना व्यक्त केल्या.
संभाजी महाराजांना एक महिना अत्यंत हाल हाल करून मारण्यात आले. त्यामुळे हा एक महिना शिवप्रतिष्ठान कडून बलिदान मास म्हणून पाळला जातो. एक महिना हा बलिदान मास पाळल्यानंतर संभाजी महाराजांची न निघालेली अंत्ययात्रा काढली जाते.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली