LOKSANDESH NEWS
संतोष देशमुख हत्ये प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करा मनोज जरांगेंची मागणी
संतोष देशमुख प्रकरणाचा पुन्हा तपास करा तरच देशमुख कुटुंबाला न्याय मिळेल अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलीये. संतोष देशमुख यांच्या हत्येसाठी मुंबई आणि परळीतल्या धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात बैठक झाली. त्यामुळे या प्रकरणात सामूहिक कटात धनंजय मुंडे हे सहआरोपी झाले पाहिजे.
त्याचबरोबर या प्रकरणात आरोपींना ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं. त्यांनाही सहआरोपी का केलं नाही असा सवालही जरांगे यांनी केला आहे.
त्यामुळे धनंजय मुंडेंना या प्रकरणात आरोपी करत या प्रकरणाचा पुन्हा तपास करावा अशी मागणी जरांगे यांनी केली आहे.