स्वारगेट घटनेच्या पार्श्वभूमीवर सांगली बस स्थानकाची शिवसेना जिल्हाप्रमुखांकडून पाहणी
सांगली प्रतिनिधी दि: ६/३/२०२५
गेल्याच आठवड्यात पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका महिलेवर एका नराधमांकडून झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती या घटनेनंतर मात्र राज्यातील सर्वच बस स्थानकांच्या सोयीसुविधांबाबत प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं.
शिवसेनेचे नेते तथा माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्वच बस स्थानकांच्या मार्फत प्रवाशांना विशेषता महिलांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा व्यवस्थितपणे दिल्या जातात का? यामध्ये काही त्रुटी आहेत का? हे पाहून त्याबाबत पाठपुरावा करण्याचे आदेश आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
त्यानुसार आज सांगली मध्यवर्ती बस स्थानकात जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे आणि महिला आघाडी संपर्कप्रमुख सुनिता मोरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह पाहणी करून महिलांना पुरवल्या जाणाऱ्या सोयी सुविधा बाबत चौकशी करून पाहणी केली.
स्वच्छतागृह,हिरकणी कक्ष, लहान बाळांना स्तनपान करण्यासाठीचा कक्ष, महिला कर्मचाऱ्यांच्या साठीच्या विश्रामगृहाची तसेच बंद पडलेल्या गाड्यांची पाहणी केली.
दरम्यान महिलांसाठी पुरवल्या जाणाऱ्या मूलभूत सुविधांमध्ये काही प्रमाणात अभाव आढळून आल्यानुसार तशा सूचना एसटीचे अधिकारी भोकरे यांना दिल्याची माहिती जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांनी दिली आहे. तर सांगली बस स्थानक परिसरात रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत अनेक जण दारू गांजा सह इतर अमली पदार्थांचे सेवन करून फिरत असतात त्यामुळे या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालावे आणि जास्तीत जास्त महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी ही महिला आघाडी संपर्कप्रमुख सुनीता मोरे यांनी केली आहे.
यावेळी रुक्मिणी ताई आंबिगिरे महिला आघाडी जिल्हाप्रमुख, श्री हरिभाऊ लेंगरे, समीर लालबेग, मोहसीन मुल्ला, पायल ताई पाटील, राजश्री ताई कोळी, प्रणाली ताई लोंढे, शीलाताई आपटे, शेवंताताई गस्ते,उषाताई वारे, इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.