शासन व विविध ग्राहक चळवळीतील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने वर्ध्यातील विकास भवन येथे जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला वैशाली गजभिये-अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, विवेक देशमुख- सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,संजय मसंद-सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अनिल तोष्णीवाल सह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख वक्ते अजय भोयर - सचिव अखिल भारतीय ग्राहक कल्याण विदर्भ शाखा व ॲड. प्रीती साहू - विधी सल्लागार यांची उपस्थिती होती. तसेच यावेळी मोठ्या संखेने नागरिकांची उपस्थित होती.
या कार्यक्रमात ग्राहकांनी जागरूक राहावे, सजग राहावे, ग्राहकांनी खरेदी करतांना शंका असल्यास वजन मापे तपासून घ्यावी, कुठेही फसवणूक होत असल्याचे आढळल्यास जागरूक ग्राहक म्हणून तक्रार करावी असे मार्गदर्शन कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अजय भोयर यांनी उपस्थित ग्राहकांना मार्गदर्शन केले.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली