सोलापूर शहरात बर्ड फ्लूचा शिरकाव, मागील काही दिवसात अचानक मृत पावलेल्या कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लू मुळेच झाल्याचे स्पष्ट
- भोपाळ येथील लॅबमधून मृत कावळ्यांचे रिपोर्ट हे बर्ड फ्लू पॉसिटीव्ह आढळल्याने सोलापूर महापालिका आणि पशुसंवर्धन विभाग अँक्शन मोडवर
- सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज तलाव, श्री सिध्देश्वर महाराज तलाव, खंदक बाग या परिसरात मागील काही दिवसात पन्नासहून अधिक कावळ्यांचा मृत्यू
- या कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचे स्पष्ट झाल्याने मृत कावळे आढळून आलेले परिसर निर्जंतकीकरणाला सुरुवात
- मृत कावळे आढळून आलेले परिसर हे नागरिक फिरण्याचे परिसर असल्याने खबरदारी म्हणून 21 दिवस बंद केले जाणार
- तर 1 किलोमीटर परिसरातील चिकन शॉप्समधील कोंबड्याची देखील होणार तपासणी तसेच आरोग्य विभागामार्फत 1 किलोमीटर परिसरातील आजारी नागरिकांची देखील माहिती घेतली जाणार
- मात्र अद्याप कोंबड्यात आणि माणसामध्ये कोणत्याही पद्धतीने बर्ड फ्लूचा शिरकाव झालेलं नाही, त्यामुळे घाबरण्याची आवश्यकता नाही, प्रशासनाचे आवाहन
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली