दर्यापूर ते अकोला मार्गावरील सोमानी जिनिंग जवळ ट्रकला लागली भीषण आग

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

दर्यापूर ते अकोला मार्गावरील सोमानी जिनिंग जवळ ट्रकला लागली भीषण आग

                                                           LOKSANDESH NEWS 





दर्यापूर ते अकोला मार्गावरील सोमानी जिनिंग जवळ ट्रकला लागली भीषण आग




अमरावतीच्या जिल्ह्याच्या दर्यापूर ते अकोला मार्गावरील सोमानी जिनिंग जवळ एका कापसाने भरलेल्या ट्रकला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. रुस्तमपुर येथून दर्यापूर येथील टोले जिनिंगवर हा ट्रक कापूस घेऊन जात असताना अचानक या ट्रक मधील कापसाला आग लागल्याने एकच खळबळ उडाली. 

सदर आग कशाने लागली याचा अद्यापही शोध लागलेला नसला तरी मात्र दर्यापूर नगरपालिकेच्या अग्निशामक वाहनाने तात्काळ घटनास्थळ गाठून सदर आगीवर नियंत्रण मिळवले त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या आगीत शेतकऱ्याचा हजारो रुपयांचा कापूस जळून खाक झालेला आहे. 

सदर आग लागल्याने काही वेळ मुख्य रस्त्यावर वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली होती.




 लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली