सिंगापूर येथील अभ्यास गटाच्या दौऱ्यासाठी जिल्ह्यातील दोन शिक्षकांची निवड
शिक्षण विभागाच्या ‘स्ट्रेंथनिंग टीचिंग-लर्निंग अँड रिझल्ट्स फॉर स्टेट्स’ (स्टार्स) प्रकल्पांतर्गत आंतरराष्ट्रीय एक्सपोजर भेटीसाठी गोंदिया जिल्ह्यातील 2 शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. एक्सपोजर टूरचा भाग म्हणून राज्यभरातून एकूण 50 शिक्षक, अधिकारी व कर्मचारी सिंगापूरला भेट देणार आहेत.
हे प्रशिक्षण 22 ते 27 मार्च दरम्यान होणार आहे. आंतरराष्ट्रीय एक्सपोजर भेटीचा उद्देश शिक्षकांना जागतिक शिक्षण पद्धती, शिकण्याचे अनुभव आणि 21 व्या शतकातील शैक्षणिक कौशल्ये जसे की अनुभवात्मक शिक्षण, गट अध्यापन, समस्या सोडवण्याच्या पद्धती आणि प्रकल्प-आधारित शिक्षण यांची ओळख करून देणे आहे.
आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दौऱ्यासाठी गोंदिया येथून निवडलेले 2 शिक्षकामध्ये गोंदिया तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा खर्राचे सहाय्यक शिक्षक नरेंद्रकुमार नत्थुलाल गौतम व आदिवासी भाग असलेल्या देवरी तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथ. शाळा भागीचे सहायक शिक्षक नरेंद्र कृष्णाजी अमृतकर यांचा समावेश आहे. मुख्याध्यापक नरेंद्र अमृतकर यांनी या सिंगापूर अभ्यास दौऱ्या च्या श्रेय सर्व विद्यार्थी व सहकारी शिक्षक वर्ग यांना दिले.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली