LOKSANDESH NEWS
सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर खामगावात पोलिसांनी केली मॉक ड्रिल
आगामी काळातील सण-उत्सवाच्या काळात तेढ निर्माण होवून तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. अशा परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर वचक राहावा तसेच पोलीस हे नागरिकांच्या जिवीताचे संरक्षणाकरीता तयार आहेत. त्यामुळे आज बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात पोलीस व दंगा काबू पथकाच्या वतीने शिवाजी नगर पोलीस स्टेशन समोरील फरशी चौकात मॉक ड्रिल करण्यात आली.
मॉक ड्रिल मध्ये बेकायदेशीर जमावावर दगड फेक करणाऱ्या लोकांवर अग्निशमन द्वारे पाण्याचा मारा करून त्यांना ताब्यात घेण्यात आले, अशा सर्व कृतींचे प्रात्यक्षिक करण्यात आले.
यावेळी शहर व शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार व पितांबर जाधव यांच्यासह 12 अधिकारी 150 पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली