जालन्यात दुकानात घुसून व्यापाऱ्यावर कोयत्याने वार, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
जालन्यात दुकानात घुसून एका व्यापाऱ्यावर कोयत्याने वार केल्याची घटना घडलीय. जालना शहरातील कडबी मंडी भागात हरकाराम चेलाराम चौधरी यांची खुशी इमिटेशन नावाची ज्वेलरीची दुकान आहे. या दुकानात अज्ञात दोन तरुणांनी प्रवेश केला. यातील एका तरुणाकडे एक धारदार कोयता ही होता.
यावेळी अज्ञात तरुणांनी पैसे मागत व्यापाऱ्याला कोयता मारून जखमी केलंय. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या प्रकरणी अज्ञात दोन तरुणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत हरकाराम चौधरी यांच्या पोटाला चाकू लागल्याने ते जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या प्रकरणी दोन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.