LOKSANDESH NEWS
धरणातील पाणी सिंचनाशिवाय उद्योग आणि शहरांना दिल्यास यापुढे पाइपलाइन फोडून आंदोलन करू, शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांचा इशारा
खडकपूर्णा धरणातून सिंचनासाठी पाणी मिळावं यासाठी बुलढाण्यातील राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त कैलास नागरे यांना आत्महत्या करावी लागते ही खेदाची बाब असून, यासंदर्भात आज शेतकरी नेते प्रकाश पोहरे आणि रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत चर्चा केली.
शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी न देता शहर आणि उद्योगांना पाणी दिल्यास यापुढे पाईपलाईन फोडून आंदोलन करण्याचा इशारा प्रकाश पोहरे यांनी दिला आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली