सांगली मिरज रोड महास्वच्छता अभियान ४टन उचलला कचरा
१२००कर्मचारी अधिकारी,संस्था यांच्या सहभाग
सांगली मिरज रोडवर आज सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या वतीने महास्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते.
यावेळी मा.आयुक्त शुभम गुप्ता यांच्या उपस्थितीत पुष्पराज चौक कर्मवीर ,भाऊराव चौक ते मिरज महात्मा गांधी पुतळा विविध सामाजिक संस्था विद्यार्थी व मनपा बाराशे कर्मचारीच्या माध्यमातून सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी साळुंखे विद्यालय मिरज व अन्य सामाजिक संस्था कार्यकर्ते यांनी सहभाग नोंदवला होता उपायुक्त स्मृती पाटील शिल्पा दरेकर विजया यादव सहाय्यक आयुक्त विविध विभागाचे प्रमुख कर्मचारी यावेळी उपस्थित होते
साधारणपणे ४टन व १२०० कर्मचारी अधिकारी विविध संस्था कार्यकर्ते यांच्या माध्यमातून सदरची स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयन्त केले आहे.
सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या वतीने यापुढे देखील असे महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे मा शुभम गुप्ता आयुक्त यांनी सर्व एनजीओ सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांना याद्वारे आव्हान केले आहे की सदस्यता मोहिमेमध्ये आपला सहभाग नोंदवून आपले शहर स्वच्छ करण्यासाठी आपला हातभार लावावा स्वच्छता ही सेवा या मूलत्वाने आपले शहर स्वच्छ व सुंदर करण्यास सहकार्य करावे अशी विनंती केली आहे.
मुख्य स्वच्छता अधिकारी अनिल पाटील व मुख्य स्वच्छता निरीक्षक याकूब मद्रासी यांच्या टीमने चागले काम केले आहे,
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली