LOKSANDESH NEWS
धुळे शहरातील साक्री रोडवरील सुमन हॉस्पिटल येथे सर्रासपणे सुरू होते गर्भपात केंद्र, महापालिकेच्या पथकाने केली कारवाई
धुळे शहरातील साक्री रोड परिसरात असलेल्या सुमन हॉस्पिटल या ठिकाणी सर्रासपणे गर्भ लिंग निदान सुरू असल्याची तक्रार आमची मुलगी या वेबसाईटवर प्राप्त झाल्यानंतर धुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार महापालिकेच्या संबंधित पथकाने सुमन हॉस्पिटल या ठिकाणी धाड टाकली असता संबंधित पथकाला या ठिकाणी सर्रासपणे गर्भपात होत
असल्याचे आढळून आले असून विशेष म्हणजे या ठिकाणी गर्भपात करणारी संबंधित महिला ही फक्त नववी पास असल्याची धक्कादायक माहिती चौकशीतून समोर आली आहे.
सुमन हॉस्पिटल या संबंधित रुग्णालयावर कठोर कारवाई करण्यात येणार असून याप्रकरणी डॉ. सोनल वानखेडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यासोबत एक नर्स देखील ताब्यात घेऊन पोलीस आता त्यांची कसून चौकशी करीत आहे. तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम देखील सुरू आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली