LOKSANDESH NEWS
वाढत्या तापमानापासून गाडीचे संरक्षण व्हावे यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांनी
चक्क गाडीला थापले गाईचे शेण
गाईचे शेण आणि गोमूत्र यांच्यामध्ये आयुर्वेदिक घटक मानले जातात. याचाच अभ्यास करून पंढरपूरच्या एका आयुर्वेदिक डॉक्टरांनी चक्क गाईचे शेण आणि गोमूत्र आपल्या कारला थापले आहे. कारवर गाईचे शेण आणि गोमूत्र लावल्याने कार मधील तापमान कडक उन्हातही निम्म्यावर येते.
परिणामी कारमध्ये थंडावा जाणवतो. या हेतूने पंढरपूरच्या डॉ. रामहरी कदम या डॉक्टरांचा देशी मात्र वैज्ञानिक सिद्धांतावरील जुगाड सध्या चर्चेत आहे.
संपूर्ण कारला शेणाचे आणि गोमूत्राचे लेपन केल्याने कारचा लुक मध्ये ही चांगलाच फरक पडलाय.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली