LOKSANDESH NEWS
आमदार विजयकुमार देशमुख बाजार समिती लढवणार नाहीत; पण भूमिका थोडी अस्पष्टच
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सलग पाच वर्ष चेअरमन पदाचा कार्यभार सांभाळणारे माजी पालकमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख यांनी यंदा बाजार समितीची निवडणूक लढवणार नाही असे सांगितले असले तरी ऐनवेळी ते निर्णय बदलूही शकतात अशी शक्यता त्यांच्या एकूणच बोलण्यावरून वाटत आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया मंगळवार 25 मार्च 2025 पासून सुरू होणार आहे. यंदाच्या बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना मतदान नाही. सोसायटी संचालक, ग्रामपंचायत सदस्य आणि हमाल, तोलार, व्यापारी यांचे मतदान असणार आहे.
विजयकुमार देशमुख यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी यंदा शेतकरी मतदार नसल्याने आपण ही निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे सांगितले.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली