स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांची कारवाई आंतरराज्यीय रेकॉर्डवरील गुन्हेगाराने चोरी केलेला गुन्हयातील मुद्देमाल हस्तगत

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांची कारवाई आंतरराज्यीय रेकॉर्डवरील गुन्हेगाराने चोरी केलेला गुन्हयातील मुद्देमाल हस्तगत

LOKSANDESH NEWS 


स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांची कारवाई आंतरराज्यीय रेकॉर्डवरील गुन्हेगाराने चोरी केलेला गुन्हयातील मुद्देमाल हस्तगत





मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करून, मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.

सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील एक पथक तयार करुन त्यांना उमदी पोलीस ठाणे हद्दीमध्ये करेवाडी येथील मोरया ज्वेलर्स दुकानामध्ये येवून अर्धा ग्रॅम सोन्याची कोणतीही वस्तू दाखवा असे सांगून ती वस्तू फिर्यादी दाखवत असताना फिर्यादीची नजर चुकवून १२ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरी केले होते. सदर गुन्हा करणारे संशयित इसमाची माहिती घेवून गुन्हा उघडकिस आणणेबाबत आदेश दिले.

नमूद पथकास दिले आदेशाप्रमाणे, पथकामधील पोह/सागर लवटे यांनी सदर गुन्हयातील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासले असता सदरचा गुन्हा कर्नाटक राज्यातील रेकॉर्डवरील आरोपी मोहम्मद अली बाबर अली ईराणी, रा श्रीकृष्ण नगर, गदग, राज्य कर्नाटक याने व अनोळखी साथीदाराने केला असल्याची खात्री झाली.

त्या अनुशंगाने नमूद पथक हे कर्नाटक राज्यातील गदग येथे जावून तेथील बेडगिरी पोलीस ठाणे यांची मदत घेवून सदर आरोपीचा शोध घेतला असता सदरचा आरोपी राहते ठिकाणी मिळून आला नाही. तरी सदर गुन्हयाचा आरोपीचे नातेवाईकांचेकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांनी गेल्या महिन्यात करेवाडी, ता जत येथील सोन्याच्या दुकानात चोरी केलेला सोन्याचा माल संशयित आरोपीने घरी ठेवला आहे, तो माल त्यांनी पथका समक्ष हजर केला. तसेच मोहम्मद अली बाबर अली ईराणी या आरोपीबाबत चौकशी केली असता त्याचे नातेवाईकांनी तो जास्त घरी येत नसल्याचे व त्याचा सध्याचा ठावठिकाणा माहित नसल्याचे सांगितले. त्यानंतर सदरचा मुद्देमाल जप्ती पंचनाम्याने पोहेका / सागर लवटे यांनी जप्त केला आहे.

सदर बाबत उमदी पोलीस ठाणेचा क्राईम अभिलेख तपासला असता वरील प्रमाणे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली.

सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेवर महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात वेगवेगळ्या पोलीस ठाणेस चोरीचे व हातचलाखीचे गुन्हे दाखल आहेत.

सदर जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी उमदी पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास उमदी पोलीस ठाणे करीत आहेत. तसेच यातील परागंदा आरोपीचा शोध गोपनीय बातमीदारामार्फत घेवून त्यांना ताब्यात घेत आहोत.



 लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली