जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि भाजपाच्या गटनेत्यांचं जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन
जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील अनेक अंगणवाडीत रिक्त असलेल्या मदतनीस पदांची पदभरती प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, या पदभरतीत महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आर्थिक व्यवहार करून प्रक्रियेत घोळ केल्याचा आरोप जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष एकनाथ फेंडर आणि भाजपचे गटनेते विनोद बांते यांनी केला आहे.
या पदभरतीच्या विरोधात त्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारातचं ठिय्या आंदोलन सुरू केल आहे.
या पदभरतीच्या विरोधात महिला व बालकल्याण अधिकाऱ्यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत झालेली पदभरती रद्द करावी आणि अन्यायग्रस्तांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली