पुण्यातील हृदय पिळवटून टाकणारी घटना
पती पत्नीच्या भांडणामुळे चिमुरड्याचा नाहक बळी
पुण्यातील चंदन नगर परिसरात पती ने पत्नी वर असलेल्या चारित्र्य संशयावरून वारंवार होत असलेल्या भांडणामुळे साडेतीन वर्षांच्या लहान बाळाचा गळा कापून केला खून करण्यात आला आहे.हिम्मत माधव टीकेटी असे खून झालेल्या लहान मुलाचे नाव आहे.चंदननगर पोलिसांनी मुलाच्या वडिलांना अटक केली आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माधव याला आपल्या पत्नीच्या चारित्र्याचा संशय होता.काल दुपारी पती पत्नीत भांडणे झाली.पती मुलाला घेऊन घराबाहेर गेला होता पण रात्र झाली पण दोघे हि घरी नाही आले तेव्हा त्याची पत्नी चंदननगर पोलिस ठाण्यात आली पतिआणि मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दिली.पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून त्यांचा माग काढला.
पहाटे तो चंदननगर जवळील जंगलात दारूच्या नशेत सापडला.त्याला मुलगा कोठे आहे विचारल्यावर त्याने मारून टाकले असे सांगितले. पोलिसांनी जंगलात शोध घेतल्यावर तेथे मुलाचा गळा कापल्याचे दिसून आले.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली