आमदार झाल्यानंतर प्रथमच आर्वी शहरात दाखल होताच दादाराव केचे यांचे जंगी स्वागत
आमदार दादाराव केचे हे विधान परिषदेचे आमदार झाल्यानंतर प्रथमच आर्वी शहरात दाखल होताच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. आर्वी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भव्य रॅली निघाली. ढोल, ताशा, डीजेच्या तालावर भाजपा कार्यकर्त्यांनी यावेळी ठेका धरला.
जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळण करण्यात आली. या रॅलीमध्ये दादाराव केचे यांच्यासह आमदार सुमित वानखेडे व भाजपा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती दिसून आली. तसेच भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधान परिषद आमदार झाल्यानंतर प्रथमच घरी आल्यावर दादाराव केचे यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे औक्षण केले. दादाराव केचे यांनी यावेळी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले. दादाराव केचे यांची विधानपरिषदेच्या आमदार पदी बिनविरोध निवड झाल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.