बीड : बीड जिल्ह्यातील
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोप पत्र
दाखल केले आहे. या आरोप पत्रात वाल्मीक कराड याचे मुख्य आरोपी असा उल्लेख
करण्यात आला आहे. दरम्यान, आता समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आमदार धनंजय मुंडे, बालाजी तांदेळे यांच्यासह अन्य दहा जणांना सह आरोपी करण्याची
मागणी केली आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. अंजली
दमानिया म्हणाल्या, बालीजी तांदळेला हा पोलिसांसोबत शोध घेत होता. हे प्रकरण
ज्यावेळी वाढत होतं त्यावेळी बालाजी तांदळे यांना दोघांना अटक करुन हे प्रकरण
तिथल्या तिथे मिटवा, वाल्मीक कराड याच्यापर्यंत येऊ देऊ नका याच्यासाठी धनंजय मुंडे प्रयत्न करत होते, असा दावा
दमानिया यांनी केला.
माझी मागणी धनंजय मुंडे, बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे, सारंग आंधळे, डॉ. वायबसे व
त्यांच्या पत्नी, एसपी
बारगळ, पीएसआय
राजेश पाटील, पीआय
महाजन, पीआय
भागवत शेलार, एलसीबीचे
गित्ते या सर्वांना सहआरोपी करा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली.