LOKSANDESH NEWS
उच्चशिक्षित तरुणाने आधुनिक शेतीतून साधली आर्थिक उन्नती
वारंवार वातावरणातील बदलामुळे अतिवृष्टी आणि नापिकी, दुसरीकडे पिकांना कमी भाव यामुळे पारंपारिक शेती परवडत नसल्याची ओरड नेहमीच केली जाते, मात्र आधुनिक शेती केल्यास शेतीतून आर्थिक उन्नती साधता येते, याचे उत्तम उदाहरण बुलढाणा जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाड येथील युवा शेतकरी गणेश मांटे या युवा शेतकऱ्याने आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि नोकरीच्या मागे लागून पैसा, वेळ व्यर्थ न घालता त्याने आपल्याकडे असलेल्या वडिलोपार्जित दहा एकर शेतीमध्ये पारंपरिक शेतीला फाटा देत फळबाग लागवड केली.
या शेतीतच आपल्या कुटुंबासह मेहनत घेऊन त्याने तीन एकर डाळिंब, दोन एकर द्राक्ष बाग, आणि उर्वरित पाच एकरामध्ये खरबूज टरबुजाची लागवड केली, ज्याच्या माध्यमातून हा तरुण वर्षाकाठी जवळपास 40 लाख रुपये निव्वळ नफा कमवतो आहे.
इतर तरुणांनी देखील फळबाग आणि भाजीपाला लागवड करून, आधुनिक शेतीच्या माध्यमातून आपली उन्नती साधावी असे आवाहन हा प्रगतिशील युवा शेतकरी इतर तरुणांना करत आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली