LOKSANDESH NEWS
संकल्प प्रतिष्ठानतर्फे माता जगदंबेचा भव्य आगमन सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न
संकल्प प्रतिष्ठान व शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक आयोजित चैत्र नवरात्र उत्सव २०२५ माता जगदंबेची भव्य स्वरूपात मरवणूक काढत आगमन सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. ठाण्यातील किसन नगर मैदान एक या परिसरात गेल्या पंधरा वर्षापासून चैत्र नवरात्र उत्सवाचा आयोजन करण्यात येत आहे.
या चैत्र नवरात्र उत्सवाची सुरुवात गुढीपाडव्याने होते. रविवार ३० मार्च ते सोमवार ७ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या नवरात्र उत्सवात अनेक मान्यवर देवीच्या दर्शनाला येत असतात. येथे येणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. भक्तांच्या हाकेला धावणारी व नवसाला पावणारी अशी या देवीची ख्याती आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनाला येत असतात.
शुक्रवारी ठाण्यातील किसन नगर एक मैदान येथे शिवसेनेचे उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक माजी नगरसेविका जयश्री फाटक यांनी भक्तिभावाने माता जगदंबेची मोठ्या थाटात आगमन मिरवणूक काढली. या आगमन मिरवणूकित ढोल वादन, पारंपरिक तारपा नृत्य, लेझीम, बेंजोच्या गजरात माता जगदंबेचे मोठ्या थाटामाटात स्वागत केले.
यावेळी देविका फाटक, स्थानिक माजी नगरसेवक दीपक वेतकर यांच्यासह शिवसेनेचे महिला व पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.