LOKSANDESH NEWS
वाढत्या तापमानात पिकासाठी शेतकऱ्याने सूक्ष्म सिंचनाचा वापर करावा - मनोज कुमार ढगे
हवामान खात्याने सध्या वाढत्या उन्हाचा संदेश प्रसारित केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील अनेक भागात तापमानात वाढ होऊन उष्णतेच्या लाट येण्याची शक्यता आहे. अश्या वातावरणात शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात असलेल्या पिकांची काळजी घेणे गरजेचे आहे.
या काळात खालावलेल्या भूजलपातळी मुळे चार ते पाच दिवसाचे अंतरात सूक्ष्म सिंचनाने पिकांना पाणी शेतकऱ्यांनी द्यावेत.
भाजीपाला आणि इतर पिकासाठी पाण्याचे नियोजन व्यवस्थित करावेत. आणि पाणी उपलब्ध होण्यासाठी मागेल त्याला शेततळे या योजनेनुसार जास्तीत जास्त शेततळे शेतकऱ्यांनी घ्यावेत असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली