LOKSANDESH NEWS
इंदापूर तालुक्यात मुख्यमंत्री येत आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी येणे ही आपली संस्कृती -हर्षवर्धन पाटील
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज इंदापूर दौऱ्यावरती आहेत. इंदापूर तालुक्यातील लक्ष्मी नृसिह त्यांचं कुलदैवत असणाऱ्या या ठिकाणी ते दर्शनासाठी येणार आहेत.
त्यांच्या स्वागतासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देखील उपस्थिती लावलीय. राज्याचे मुख्यमंत्री इंदापूर तालुक्यात येणे आणि त्यांचे स्वागत करणे ही आपली संस्कृती असून ती आम्ही जपणार असा हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत.
महायुती सरकारने कर्जमाफी जाहीरनाम्यात मांडली होती परंतु प्रत्यक्षात आता ती कर्जमाफी करणे महत्वाचे आहे असे देखील पाटील म्हणाले.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली