LOKSANDESH NEWS
दारव्हा शहरात भरदिवसा झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील सहा आरोपींना काही तासातच अटक
दारव्हा शहरातील गणेश काळबांडे नावाचे किराणा व्यावसायिक यांचे बारीपुरा राममंदीर जवळील राहते घरी भरदिवसा पत्नी व आई यांना बंदुकीचा धाक दाखवून ३ लाख ५० हजार रुपये रोख, २० तोळे सोने, २ किलो चांदी, असा मुद्देमाल जबरीने चोरून नेला होता.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली.
त्याआधारे आरोपी हे पुसद येथून शेंबाळपिंप्री मार्ग नांदेड येथे जाण्याचे प्रयत्नात असताना शेंबाळपिंप्री येथे सहा जणांना अटक केली. ४२ लाख ८५हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली