LOKSANDESH NEWS
चंद्रशेखर बावनकुळे यांची अमरावतीमध्ये जनसंवाद सभा
राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आज अमरावती दौऱ्यावर आले असतांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जनसंवाद सभा घेतली. या सभेत शेकडो नागरिकांनी आपल्या विविध प्रलंबित समस्या मांडल्या, आणि निवेदने सादर केली. जनतेच्या समस्या ऐकून घेत पालकमंत्री बावनकुळे यांनी तत्काळ दखल घेत अधिकाऱ्यांना ऑन द स्पॉट निराकरण करण्याचे आदेश दिले.
त्यामुळे अनेक नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित समाधान झाले.
यावेळी आमदार प्रवीण पोटे, आमदार प्रवीण तायडे, आमदार केवलराम काळे, भाजपचे पदाधिकारी, तसेच शासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली