इथून पुढे तरी कांद्यावरती निर्यात बंदी आणि निर्यात शुल्क लावू नये एवढीच अपेक्षा - सदाभाऊ खोत

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

इथून पुढे तरी कांद्यावरती निर्यात बंदी आणि निर्यात शुल्क लावू नये एवढीच अपेक्षा - सदाभाऊ खोत

LOKSANDESH NEWS 



 इथून पुढे तरी कांद्यावरती निर्यात बंदी आणि निर्यात शुल्क लावू नये एवढीच अपेक्षा - सदाभाऊ खोत




- महाराष्ट्रात नगदी पीक म्हणून कांद्याकडे पाहिलं जातं आणि विशेषतः उत्तर महाराष्ट्र, खानदेश असेल, मराठवाड्याचा काही भाग असेल मोठ्या प्रमाणात कांदा लागवड होत असते 

- कांदा हे पीक गेल्या अनेक वर्ष झाले संवेदनशील पीक झालेलं आहे, राजकीय मुद्दा सुद्धा बनत चालला आहे 

- वारंवार कांदा उत्पादकांवर या देशात अन्याय होत आलेला आहे 

- केंद्र सरकारने नुकतेच कांद्यावरील निर्यात बंदी उठवली 

- या निर्णयाचे मी स्वागत करतो. परंतु, कोणत्याही शेतमालावरती शेतकऱ्याच्या पिकावरती निर्यात बंदी निर्यात शुल्क खऱ्या अर्थाने लावलं गेलं नाही पाहिजे 

- शेती सुद्धा एक उद्योग आहे, उद्योग म्हणून त्याकडे पाहिलं पाहिजे 

- ज्यांना कांदा खायला महाग वाटतो अशांनी निश्चितपणे शेतकऱ्यांच्या बांधावर यावं, कांदा लावावा, त्यावर खुशाल रात्रभर झोपावं. परंतु, शेतकऱ्यांची माती करू नये. ही भूमिका आम्ही नेहमीच घेत आलेलो आहोत 

- सरकारने इथून पुढे तरी कांद्यावरती निर्यात बंदी आणि निर्यात शुल्क लावू नये एवढीच अपेक्षा व्यक्त करतो


 लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली