LOKSANDESH NEWS
शिर्डीत आज रंगपंची उत्सव;
साईसमाधीजवळ श्रीकृष्ण पुजा
शिर्डीत आज लाखो भाविकांनी साईबाबांसोबत रंग खेळून रंगपंचमी साजरी केली. साईबाबांना कृष्ण अवतार मानून भक्त त्यांच्या जीवनात आनंद आणि समाधान आणण्यासाठी रंगपंचमी साजरी करतात.
रंगपंचमीचे खास वैशिष्ट्य म्हणजे साईंची रंगीत रथयात्रा. शिर्डीतील लाखो भाविक व ग्रामस्थ या रथयात्रेत सहभागी होऊन आनंदोत्सव साजरा करतात. साई मूर्ती आणि साई समाधीलाही आज रंगरंगोटी करण्यात आली. यानंतर साईबाबांना रंगीबेरंगी वस्त्रे परिधान करून त्यांची पूजा करण्यात आली.
त्यांच्या हयातीत साईबाबा स्वतः द्वारकामाई आणि चावडी रंगपंचमी मुलांसोबत खेळत असत. ही परंपरा आजही साईबाबा संस्थानसह शिर्डीतील ग्रामस्थ आणि साईभक्तांनी जपली आहे. आज साई व श्रीकृष्ण मूर्ती आणि साई समाधी देखील रंगवली आहेत.
यानंतर साईबाबांना रंगीबेरंगी वस्त्रे परिधान करून पूजा केली जाते.