loksandesh News
यंदा आंबा, काजू उत्पादनात होणार घट; कोकणातील बागायतदार चिंतेत
कोकणात यंदा काजू आणि आंबा उत्पादनात घट होणार असून, यामुळे बागायतदार वर्गाच्या चिंतेत वाढ झाली आहे. अवकाळी पाऊस आणि धुके यामुळे काजू आणि आंबा उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यात फुलकिडीची लागण मोठ्या प्रमाणात झाल्याने फळधारणा कमी झाल्याची दिसून येत आहे.
या व्यतिरिक्त सरकारकडून काजूवरील आयात शुल्क कमी करण्यात आल्याने काजू लागवडीकडे बागायतदारांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे याचा परिणाम उत्पादनावर होऊ शकतो.