रंगपंचमी खेळताना ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून 9 वर्षांचा चिमुकला ठार
कर्नाटक बारवाड गावात शोककळा पसरली"
निपाणी तालुक्यातील बारवाड गावात रंगपंचमीचा बेरंग झाला रंगपंचमी खेळत असताना कुमार प्रज्वल बाळासो पाटील वय वर्षे नऊ राहणार बारवाड तालुका निपाणी या चिमुकल्या मुलाचा ट्रॅक्टर ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून दुर्दैवी मृत्यू सदरची घटना कारदगा बारवाड रोडवर गंगानगर भागात सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान मांगुर कडून कारग्याकडे जाणाऱ्या बारवाड गावच्या गंगानगर भागातील हद्दीत येताच एम एच झिरो नऊ 17 52 या ट्रॅक्टर व डबल ट्रॉलीच्या ट्रॅक्टर खाली सापडून प्रज्वल बाळासो पाटील वय वर्षे नऊ या चिमुकल्याचा मृत्यू झाल्यामुळे बारवाड कारदगा मांगुर परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
आज रंगपंचमीच्या सणामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना बारवाड गावावर वर प्रज्वलच्या अचानक घडलेल्या अपघाती मृत्यूमुळे शोककळा पसरली असून सदर घटनेची नोंद सदलगा पोलीस स्टेशनमध्ये झाले .
असून चिकोडीचे शिपीआय विश्वनाथ चौगुले तसेच सदलगा पोलीस स्टेशनचे पीएसआय शिवकुमार बिरादार यांनी आपल्या सहकार्यासह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला प्रज्वल पाटील या चिमुकल्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी निपाणीच्या गांधी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला असून घटनास्थळी प्रज्वला बघण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती त्यामुळे दोन्ही कडील बाजूला ट्राफिक जाम झाले होते.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली