जिल्ह्यातील ‘त्या’ 65 गावांवर 1 एप्रिलपासून ओढावणार ‘जलसंकट’, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील चारही प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद करण्याचा निर्णय
गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील रामपुरी, अर्जुनी मोरगाव, खांबी आणि शिरेगाव या चार प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून 65 गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. मात्र, शासनाने 1 एप्रिल 2019 पासून अनुदान बंद केल्याने या योजना चालवणार्या संस्था आर्थिक अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे संस्थांनी सभा घेऊन 1 एप्रिल 1015 पासून चारही योजना पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या योजनांवर अवलंबून असलेल्या 65 गावांवर येत्या 1 एप्रिलपासून जलसंकट ओढावणार आहे.
पाणीपुरवठा योजनांचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे.
वाढलेली मजुरी, रसायनांचा खर्च, विजेचे बिल आणि पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक इतर खर्च मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अनुदान मिळत नसल्याने या योजना दरवर्षी 4 ते 5 लाख रुपयांच्या तोट्यात जात आहेत. जिल्हा परिषदेमार्फत शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला गेला, मात्र अद्याप अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे संस्थाचालकांनी शासनाने 1 एप्रिल 2025 पूर्वी अनुदान दिले नाही, तर चारही योजना बंद करण्यात येतील, असा ठराव केला आहे. या योजनांचा पाणीपुरवठा बंद झाला तर या 65 गावातील नागरिकांवर ऐन उन्हाळ्यात जलसंकट ओढावणार आहे.
तर या नागरिकांना समस्या निर्माण झाली तर जनआंदोलन उभारण्याच्या इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे..
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली