ओव्हरहेड वायर तुटल्याने कोकण रेल्वे 4 ते 5 तास विलंबाने, प्रवाशांमध्ये नाराजी
- ओव्हर हेड वायर तुटल्याने विस्कळीत झालेली कोकण रेल्वेची वाहतूक सलग दुसऱ्या दिवशी देखील विलंबानं
- अनेक गाड्या चार ते पाच तास उशिरा
- कोकण कन्या पाच तास उशिरा, तुतारी एक्सप्रेस एक तास उशिरा, वंदे भारत एक्सप्रेस अर्धा तास उशिरा, तेजस एक्सप्रेस अर्धा तास उशिरा, केरळा संपर्क क्रांति एक्सप्रेस अर्धा तास उशिरा
- तर रत्नागिरीहून मुंबईला जाणारी रत्नागिरी दिवा गाडी एक तास उशिरा, मंगला एक्सप्रेस सव्वा तास उशिरा, नेत्रावती एक्सप्रेस सुद्धा सव्वा तास उशिराने
- काल राजापूर जवळच्या आडवली इथे ओव्हरहेड वायर तुटल्याने कोकण रेल्वेची वाहतूक झाली होती विस्कळीत
- कालच्या प्रकाराने 11 गाड्या रेल्वे गाड्या धावत होत्या विलंबाने
- आज देखील जवळपास नऊ गाड्या विलंबाने
- होळीसाठी आलेल्या चाकरमान्यांचे परतीच्या प्रवाशांमधून नाराजीचे सूर