36 वर्षीय विवाहितेवर 19 वर्षीय विकृताचा अत्याचाराचा प्रयत्न

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

36 वर्षीय विवाहितेवर 19 वर्षीय विकृताचा अत्याचाराचा प्रयत्न

 LOKSANDESH NEWS 


 36 वर्षीय विवाहितेवर 19 वर्षीय विकृताचा अत्याचाराचा प्रयत्न


      छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका 19 वर्षीय विकृत मानसिकतेच्या तरुणाने 36 वर्षीय विवाहितेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे आणि यावेळी विवाहितेने आरडाओरड सुरू करत प्रतिकार केल्याने त्या विकृताने महिलेच्या शरीरावर धारदार कटरने जवळपास 15 वार करत तिला जखमी केले आहे.

 तसेच तिचा चेहराही विद्रूप करत हत्येचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी आरोपी अभिषेक तात्याराव नवपुते याला चिखलठाणा पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

     स्वारगेट बलात्कार प्रकरणामुळे अवघ्या राज्याचे राजकारण तापले असताना आता छत्रपती संभाजीनगरमध्येही एका विवाहितेवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेत आरोपीने पीडितेवर कटरने १५ हून अधिक वार करत तिचा चेहरा विद्रुप करण्याचा प्रयत्न केला

.तिच्यावर संभाजीनगर मधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अभिषेक तात्यावर नवपुते 19, रा. घारदोन असे आरोपीचे नाव आहे. चिखलठाणा पोलिसांनी त्याला अटक केली असून, पुढील तपास चालू आहे.