चोपडा नगरपालिकेकडून कर वसुलीला सुरुवात, ग्रामस्थांनी कर 31 मार्चच्या आधी भरावे नगपालिकेकडून सूचना

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

चोपडा नगरपालिकेकडून कर वसुलीला सुरुवात, ग्रामस्थांनी कर 31 मार्चच्या आधी भरावे नगपालिकेकडून सूचना

                                                           LOKSANDESH NEWS 




 चोपडा नगरपालिकेकडून कर वसुलीला सुरुवात, ग्रामस्थांनी कर 31 मार्चच्या आधी भरावे नगपालिकेकडून सूचना 



 चोपडा शहरातील मालमत्ता कर व पाणीपट्टी कर वसुली नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू आहे. 31 मार्च ला काही दिवस बाकी आहे त्यामुळे नगरपालिकेने कर वसुलीसाठी पथक तयार केले आहे. तुकडा नगर परिषदेच्या वतीने शहरातील मालमत्ता कर 81 टक्के वसूली झाली आहे. तर पाणीपट्टी कर 47% करण्यात आलेली आहे. चोपडा शहरातील आठ शासकीय कार्यालयांकडे मालमत्ता व पाणीपट्टी कर थकबाकी असल्याने जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार नगर परिषदेच्या वतीने त्यांना पत्र देण्यात येत आहे. 

आठ शासकीय कार्यालयांकडे 68 लाख मालमत्ता कर तर, दहा लाख 25 हजार पाणीपट्टी कर थकबाकी आहे. नगरपरिषदेच्या वतीने कर वसुलीसाठी पथक तयार करण्यात आले असल्याने शासकीय कार्यालयात जाऊन त्यांनी थकबाकी संदर्भात पत्र दिले आहे.

 31 मार्चपर्यंत चोपडा शहरातील नागरिकांनी मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावे अन्यथा 31 मार्चनंतर त्याच्यावर व्याज आकारणी सुरू होईल व आपल्या मालमत्तेवर बोजा बसविण्यात येईल असे आव्हान नागरिकांना मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी केले आहे. 



 लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली