LOKSANDESH NEWS
अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त प्रशासनाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक संचालनालय महाराष्ट्र राज्य शासनातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरवगाथा हा कार्यक्रम संत रोहिदास सभागृह आठवडी बाजार हदगाव येथे संपन्न झाला.
आज दिनांक 19 /03/2015 रोजी संत रोहिदास सभागृह हादगाव या ठिकाणी प्रो एंटरटेनमेंट या संस्थेमार्फत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास पुण्यश्लोक अहिल्याबाई देवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित नाटिका, पोवाडे नृत्य व व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली