बिहार : सोन्याची दुकाने
लुटल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या किंवा वाचल्या असतील. पण, बिहारच्या अराहमध्ये दिवसाढवळ्या 25 कोटी रुपयांचा दरोडा टाकल्याची
धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील गोपाळी चौकातील तनिष्क ज्वेलरी शोरुममध्ये
शिरलेल्या सशस्त्र दरोडेखोरांनी सुमारे 25 कोटी रुपयांचे दागिने लुटून पोबारा केला. या दरोड्याची संपूर्ण घटना
दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
शोरुममध्ये
लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दरोड्याची ही घटना कैद झाली आहे. फुटेजमध्ये
स्पष्टपणे दिसत आहे की,
आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास सशस्त्र
दरोडेखोर शोरुममध्ये घुसतात आणि दुकानातील सर्वांना धमकावून सोने, चांदी, हिऱ्याचे दागिने बॅगेत भरुन पळ
काढतात. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. स्टोअर मॅनेजरच्या म्हणण्यानुसार, सुमारे 25 कोटी रुपयांचे दागिने लुटले गेले
आहेत. तर,
रोख रकमेचे
मूल्यांकन केले जात आहे.