LOKSANDESH NEWS
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने 2025-26 चा अर्थसंकल्प सादर
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने आज 2025-26 चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्या माध्यमातून नांदेड शहरामध्ये विविध प्रकल्प व विविध योजना नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणार आहेत.
त्यामध्ये केंद्र सरकारने व राज्य सरकारने दिलेल्या निधीमार्फत विविध विकास कामे करण्यात येणार आहेत. नांदेड शहरांमध्ये राज्य शासनाच्या सूचनेनुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक देखील उभारण्यात येणार आहे व नांदेडकरांकडून कुठलाही अधिकचा कर न घेता हा अर्थसंकल्प सादर झाला आहे,
अशी माहिती पत्रकारांशी बोलताना महानगरपालिका आयुक्त महेश कुमार डोईफोडे यांनी दिली.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली