समृद्धी महामार्गावर 19 टक्क्यांनी टोलदरात वाढ, 1 एप्रिल पासून नवीन दर होणार लागू
समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आता समृद्धीवरील प्रवास महागणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) 'समृद्धी'वरील पथकरात 19 टक्क्यांची वाढ केली आहे. 1 एप्रिलपासून ही टोलदरवाढ लागू केली जाणार आहे. त्यामुळे आता वाहन चालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
समृद्धी महामार्ग सुरू झाल्यानंतर मुंबई ते नागपूरपर्यंत प्रवास करण्यासाठी कार चालकांना 1445 रुपये तर नागपूर ते इगतपुरी प्रवासासाठी 1290 रुपये टोल द्यावा लागणार आहे.
नागपूर ते मुंबई या 701 किमी अंतरापैकी नागपूर ते इगतपुरी हा 625 किमीचा मार्ग सुरू झाला आहे. तर येत्या महिनाभरात इगतपुरी ते आमने हा उर्वरित 76 किमीचा मार्गही सेवेत दाखल होणार आहे. मात्र, हा संपूर्ण महामार्ग खुला होण्यापूर्वीच 'एमएसआरडीसी'ने त्याच्या टोलमध्ये मोठी वाढ केल्याने सर्व सामान्य नाराजी व्यक्त करत आहेत निषेध व्यक्त करत आहेत.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली