जामखेळी धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला 17 ग्रामपंचायतींचा विरोध
साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील जामखेळी धरणातून सामोडे पैकी घोड्यामाळ परिसरात पाणी पुरवठा होण्यासाठी जलवाहिनीच्या कामाला पेसा ग्रामपंचायतीची परवानगी न घेता ठेकेदाराने काम सुरू केले होते
. हे काम आदिवासी पेसा संघर्ष समिती तसेच 17 गावातील ग्रामपंचायती आणि संतप्त गावकऱ्यांनी काम बंद पाडले आहे.
जामखेली धरणातून लिप्टिंगद्वारे सामोडे अंतर्गत घोड्यामाळ परिसरासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी टाकली जाणारी जलवाहिनीच्या कामासाठी लाभ क्षेत्रातील पेसा ग्रामपंचायतींची परवानगी घेण्यात आलेली नव्हती. या कामामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे नुकसान होणार होते.
यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी जलवाहिनीच्या कामाला विरोध करीत काम बंद करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून काम सुरु करण्यात येणार आहे.
गेल्या 2 दिवसांपासून हे काम बंद करण्यात आले असून, आज ग्रामस्थ याबाबत जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहेत.