काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा ईडीच्या कचाट्यात 15 ठिकाणांवर एकाचवेळी ईडीने केली छापेमारी

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा ईडीच्या कचाट्यात 15 ठिकाणांवर एकाचवेळी ईडीने केली छापेमारी

 

छत्तीसगड : छत्तीसगडमधील दारु घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई करत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 15 ठिकाणी छापे टाकले आहेत. या कारवाईमुळे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते भूपेश बघेल यांचा मुलगा विरोधात मुसंडी घट्ट होऊ शकते. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपेश बघेल यांचा मुलगा चैतन्य बघेल यांच्या घरावर ईडीने छापा टाकला आहे. ईडीशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण 15 ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. हे प्रकरण छत्तीसगडमधील दारू घोटाळ्याशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाच्या तपासात भूपेश बघेल यांचा मुलगा चैतन्य याचे नाव पुढे आले.

या प्रकरणी ईडीने यापूर्वीही अनेक मोठी कारवाई केली आहे. यापूर्वी मे 2024 मध्ये, तपास यंत्रणेने माजी IAS अनिल टुटेजा आणि रायपूरचे महापौर एजाज ढेबर यांचे भाऊ अन्वर ढेबर यांच्यासह अनेक आरोपींच्या सुमारे 18 जंगम आणि 161 स्थावर मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या होत्या, ज्यांची किंमत 205.49 कोटी रुपये होती. ईडीने जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये माजी आयएएस अनिल टुटेजा यांच्या 14 मालमत्तांचा समावेश होता, ज्यांची किंमत 15.82 कोटी रुपये होती. तर, 115 मालमत्ता अन्वर ढेबर यांच्या मालकीच्या होत्या, ज्यांची किंमत 116.16 कोटी रुपये होती. यासोबतच विकास अग्रवाल यांच्या 3 मालमत्ताही जप्त करण्यात आल्या होत्या, ज्यांची किंमत 1.54 कोटी रुपये होती. अरविंद सिंग यांच्या 33 मालमत्ता होत्या, ज्यांची किंमत 12.99 कोटी रुपये होती. अरुण पती त्रिपाठी यांची 1.35 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.