| विद्युत केंद्राच्या 132 केवी ट्रांसफार्मर मध्ये बिघाड, उन्हाळ्यात लोड शेडिंग वाढत असल्यामुळे नागरिक त्रस्त

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

| विद्युत केंद्राच्या 132 केवी ट्रांसफार्मर मध्ये बिघाड, उन्हाळ्यात लोड शेडिंग वाढत असल्यामुळे नागरिक त्रस्त


LOKSANDESH NEWS 





 विद्युत केंद्राच्या 132 केवी ट्रांसफार्मर मध्ये बिघाड, उन्हाळ्यात लोड शेडिंग वाढत असल्यामुळे नागरिक त्रस्त



 उन्हाळ्यात सर्वांनाच फॅन, कुलर यांची गरज असते. मात्र, अशातच समजा दिवसा आठ ते दहा तास विद्युत पुरवठा खंडित राहिला तर नागरिकांना मोठा त्रास सहन करण्याची वेळ आता गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, सालेकसा, देवरी, गोरेगाव या तालुक्यातील नागरिकांवर आली आहे. आमगाव तालुक्यातील 33/11kV मरविम आमगांव वितरण उपकेंद्र अंतर्गत 132kV पारेषण / ट्रांसमिशन सबस्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या चार तालुक्यातील नागरिकांना लोडशेडिंगचा फटका बसत आहे.

 गेल्या तीन दिवसांपासून आठ ते दहा तास विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक आता त्रस्त झाले आहेत. 

        महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या पारेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे याचा फटका गोंदिया जिल्ह्यातील चार तालुक्यांना बसत असून, सर्वाधिक फटका आमगाव आणि सालेकसा तालुक्याला बसत आहे. या दोन तालुक्यांमध्ये आठ ते दहा तास विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत आहे. देवरी आणि गोरेगाव तालुक्याला सुद्धा याचा फटका बसत आहेत. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना विद्यार्थी आणि व्यापारी, शेतकरी यांना मोठा फटका बसत असल्याचे दिसून येत आहेत. गेल्या चार दिवसांपासून नागरिक त्रासले असून, लवकरात लवकर विद्युत महामंडळाने याची सोय केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांना दिलाय. मात्र, अद्यापही विद्युत विभागाद्वारा नवीन 132 केबी चा ट्रांसफार्मर सुरू असून, लवकरात लवकर बसवण्याचे प्रयत्न विद्युत विभागात सुरू आहेत.


लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली