10 वर्षीय चिमुकलीवर 22 वर्षीय तरुणाने केला लैंगिक अत्याचार

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

10 वर्षीय चिमुकलीवर 22 वर्षीय तरुणाने केला लैंगिक अत्याचार

                                                              LOKSANDESH NEWS 



        10 वर्षीय चिमुकलीवर 22 वर्षीय तरुणाने केला लैंगिक अत्याचार, आरोपीला पोलिसांनी केली अटक

 

   चौथ्या वर्गात शिकणाऱ्या 10 वर्षीय चिमुकलीवर 22 वर्षांच्या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यात घडली आहे. या प्रकरणातील आरोपीला केशोरी पोलिसांनी अटक केली आहे. कमलेश मडावी (22) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे गोंदिया जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आरोपी आणि पीडिता चिमुकली ही एकाच गावातील रहिवासी असून शाळेला सुट्टी झाल्यानंतर चिमुकली ही घराच्या अंगणात खेळत होती.

 आरोपी तिच्या घरी गेला व पिण्यासाठी पाणी मागितले व त्यानंतर चिमुकलीवर अत्याचार केले ही बाब शेजाऱ्यांना लक्षात येताच शेजाऱ्यांनी पिढीतेच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलीस स्टेशन गाठत या घटनेची माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिसांनी कलम 65/2, पॉस्को 4/6/8 व 332 अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.

 घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली केशोरीचे पोलीस निरीक्षक गणेश वनारे करीत आहेत.


 

लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली