भाजपाने केंद्र आणि राज्य पातळीवर गरीबांसाठी असंख्य योजना अंमलात आणून गरीबी हटवली. आज राज्यात दहा लाख लोकांच्या खात्यावर घरकुलाचे पंधरा हजार रुपये जमा.

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

भाजपाने केंद्र आणि राज्य पातळीवर गरीबांसाठी असंख्य योजना अंमलात आणून गरीबी हटवली. आज राज्यात दहा लाख लोकांच्या खात्यावर घरकुलाचे पंधरा हजार रुपये जमा.



             लोकसंदेश न्यूज नेटवर्क

काँग्रेसने 60 वर्षे केवळ गरीबी हटावचा नाराच दिला. प्रत्यक्षात गरीबी मात्र हटलीच नाही. भाजपाने मात्र केंद्र आणि राज्य पातळीवर गोरीबांसाठी असंख्य योजना अंमलात आणून गरीबी हटवली. आज राज्यात दहा लाख लोकांच्या खात्यावर घरकुलाचे पंधरा हजार रुपये जमा झाले. यामध्ये कोणी गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न केल्यास अशा अधिकाऱयांची गय केली जाणार नाही, असा इशारा माजी पालकमंत्री, आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी दिला.


पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टफ्पा क्रमांक दोन योजनेंतर्गत आज राज्यात 20 लाख लोकांना घरकुल मंजूरीचे पत्र देण्यात आले. यापैकी दहा लाख लोकांच्या खात्यावर थेट 15 हजार रुपयांचा पहिला हफ्ता वर्ग झाला. मिरज तालुक्यात 3286 घरकुलांना मंजूरी मिळाली. त्यापैकी 2160 लाभार्थ्यांच्या खात्यावर पंधरा हजार रुपये जमा झाले. मिरज पंचायत समिती सभागृहात या घरकुल मंजूरी पत्रांचे वितरण आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.

देशात दोन कोटी लोकांना घरकुले देण्याचे उद्दीष्ट आहे. महाराष्ट्रात दुसऱया टफ्फ्यात 20 लाख घरकुले मंजूरी झाली आहे. त्यापैकी दहा लाख लाभार्थ्यांच्या खात्यावर आज ऑनलाईनद्वारे पैसे जमा झाले.
केंद्र आणि राज्यातील भाजपा शासनाने अनेक महत्त्वकांक्षी योजना राबवून गरीबी हटावण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. 20 लाख लोकांना हक्काचे घर मिळणार आहे. लाडक्या बहिणींच्या आणि भावाच्या खात्यावर यापूर्वीच पैसे जमा होऊ लागले आहेत. शेतकऱयांना थेट अनुदान दिले जाते. कर्जमाफीबरोबर नुकसान भरपाईची रक्कमही अनेकवेळा देण्यात आली. घरकुलासाठी सोलर अनुदान, मोफत वाळूही दिली जाणार आहे. अशा अनेक महत्त्वकांक्षी योजना राबविल्या जात आहेत. लाभार्थ्यांनी प्रामाणिकपणे या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार खाडे यांनी यावेळी केले.


त्यांच्या हस्ते, माजी जिल्हा परिषद सदस्या सरीता कोरबू, शोभाताई कांबळे, माजी सभापती जनाबाई पाटील, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, सहाय्यक बीडीओ ज्ञानदेव मडके, विस्तार अधिकारी संतोष इंगळे, शिवानंद कोळी, मदन यादव, मधुकर हताळे, कक्ष अधिकारी सुनिल माळी अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत दहा लाभार्थ्यांना घरकुल पत्राचे वितरण करण्यात आले.
पूर्वी शंभर रुपयांचा निधी मंजूर झाला तर लाभार्थ्यांना केवळ 15 रुपये मिळत होते. मधल्या पैशांचा केवळ भ्रष्टाचार व्हायचा. सध्या लाभार्थ्यांना थेट खात्यावर पैसे जमा केले जात आहेत. यातही कोणी अधिकाऱयांनी लाभार्थ्यांकडे पैशांची मागणी केली, अशा तक्रारी प्राफ्त झाल्या तर त्यांची गय केली जाणार नाही. लाभार्थ्यांना सुंदर घर उभारण्यासाठी प्रशासनाने प्रामाणिकपणे सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे आवाहन आमदार सुरेश खाडे यांनी केले. प्रशासन आणि लाभार्थी दोघांनीही पारदर्शक कारभाराला महत्त्व दिले तर निश्चितच गरीबी हटविण्यास त्याची मोठी मदत होईल, असा दावाही खाडे यांनी यावेळी केला.
प्रारंभी कक्ष अधिकारी सुनिल माळी यांनी स्वागत प्रास्ताविक केले. सहाय्यक बीडीओ ज्ञानदेव मडके यांनी मंजूर घरकुले आणि वितरण पत्रांचा अहवाल सादर केला.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.