संजय घोडावत इन्स्टिट्यूट “निंबस २के२५” राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

संजय घोडावत इन्स्टिट्यूट “निंबस २के२५” राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन...



लोकसंदेश न्यूज नेटवर्क 

संजय घोडावत इन्स्टिट्यूट “निंबस २के२५” राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन...


 संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या प्रांगणा मध्ये २६ फेब्रुवारी २०२५ रोजी वेळ सकाळी १०.०० ते ०५.०० “निंबस २के२५” राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. विद्यार्थांच्या नावीन्य, सर्जनशीलता आणि तांत्रिकतेच्या उत्कर्षाला प्रज्वलित करण्यासाठी विविध तांत्रिक स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थी आणि तंत्रज्ञांन कौशल्यांची कसोटी पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या मध्ये तांत्रिक कॅड बस्टर्स: संगणक-सहाय्यित डिझाइनच्या कलेमध्ये प्रभुत्व मिळविणे, सर्किटिक्स: सर्किट डिझाइन आणि इलेक्ट्रिकल मधील विविध पैलूंवर विद्यार्थांची पकड़ निर्माण करणे, टेक रोबस्टा: रोबोटिक्सच्या क्षेत्रातील नवीनतम सर्जनशीलतेचे प्रदर्शन करणे, ब्रेन स्टॉर्मर्स (क्विझ): तांत्रिक समस्यांची उत्तरे शोधत, विद्यार्थांच्या विश्लेषणात्मक क्षमतेला चालना देणे, कोड क्रुसेड: प्रोग्रामिंगची विविध आव्हाने पार करणे, पेपर प्रेझेंटेशन: विद्यार्थांच्या ग्राउंडब्रेकिंग संशोधन आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा सादरीकरण करण्यासाठी निंबस २के२५ मध्ये इजिनिअरिन क्षेत्रात शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत जास्तीत जास्त संख्याने सहभाग नोंदवून आपल्या कौशल्याचे सादरीकरण करण्याचे आव्हान इन्स्टिट्यूटचे संचालक, डॉ. विराट गिरी यांनी केले आहे.

या स्पर्धेसाठी एक लाखाहून अधिक बक्षिसे असून विविध उद्योग आणि उद्योजकांनी स्पॉन्सरशिप देण्याचे घोषित केलेले आहे. कार्यक्रमाचे समन्वयक, प्रा. प्रतीक एस. आवटी, प्राध्यापिका तृप्ती एस. पुजारी, व टीम कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन, संजयजी घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांच्या मार्गदर्शना खाली निंबस २के२५ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.