
प्रशासन अधिकारी सो सांगली मनपा. विषय- सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील एकूण वीस वार्डामध्ये स्वच्छता निरीक्षक दाखवा आणि आयुक्तांनी एक हजार रुपये मिळवा, हा नारा पुन्हा लावण्याची गरज या लोकांनी केलेली आहे. गेल्या वेळी हा नारा घेऊनच आवाज उठवलेला होता. त्यामुळे काही स्वच्छता निरीक्षक महापालिका अधिनियम या नियमानुसार सकाळी सहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत प्रत्येक प्रभागात दिसत होते व दुसरा अधिनियम असा सांगतो की त्याच भागात चार पर्यंत अहवाल गोळा करून संबंधित वरिष्ठ पातळीवर माहिती देणे.अशी कामाची पद्धत आहे परंतु सध्या यांनी पुन्हा चुकीची पद्धत चालू केली आहे. सांगली महापालिकेच्या नियमानुसार त्यांना वर्दी कंपल्सरी केली आहे व सकाळी सहा ते दोन पर्यंत प्रत्येक वार्डात असणे गरजेचे आहे परंतु हे भावी आयुक्त होणारे प्रभागात दिसतच नाहीत व वर्दीमध्ये सुद्धा म्हणजे ड्रेसवर सुद्धा राबवलेला आहे त्यावर देखील दिसत नाही. नेमके हे स्वच्छता निरीक्षक कुठे जाऊन बसत आहे हे पुन्हा एकदा तपासणे गरजेचे आहे. नुसते केबिनमध्ये जाऊन एसीची हवा खाणे व पंख्याखाली जाऊन बसणे हेच यांचे काम आहे का. हे आयुक्त साहेबांनी तपासणी गरजेचे आहे. यासाठी मागील वेळी कामगार अधिकारी यांना देखील ऑफिसमधून बाहेर पडून या सर्वांची अचानक तपासणी करावी अशी मागणी केली होती परंतु कामगार अधिकारी यांच्यापेक्षा हुशार. ऑफिसमधून यायलाच तयार नाहीत. यांची देखील तपासणी होणे गरजेचे आहे. कारण जनतेचा फुकट पैसा घेऊन आलिशान जगणे म्हणजे काम नव्हे. मा. आयुक्त साहेबांना विनंती आहे की आपणच स्वच्छता निरीक्षक प्रत्येक भागात दाखवावे व हजार रुपये मिळवून घ्यावे. आमच्या मागणीनुसार आपण यामध्ये लक्ष देऊन सहकार्य करावे ही नम्र विनंती. जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत आमचा नारा असाच असणार आहे. स्वच्छता निरीक्षक दाखवा आणि हजार रुपये मिळवा. आंतरराष्ट्रीय मानवता अधिकार आणि मीडिया संघटन, महाराष्ट्र राज्य प्रभारी- मिलिंद विष्णू साबळे
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.