दिनांक 13 फेब्रुवारी 2025
योगेवाडी एमआयडीसी भूखंडाचे रेखांकन मंजुरी अंतिम टप्प्यात ----- शिवाजी पाटील
योगेवाडी मणेराजुरी एमआयडीसी क्षेत्रातील भूखंडाचे रेखांकन मंजुरी अंतिम टप्प्यात असून येत्या 15 दिवसात प्रक्रिया पूर्ण केली जाईल अशी माहिती महाराष्ट्र विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी पाटील यांनी दिली.
कृष्णा व्हॅली चेंबर येथे आयोजित सांगली जिल्ह्यातील एमआयडीसीच्या आढावा बैठकी बैठकी ते बोलत होते.
प्रारंभी स्वागत सत्कार चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू यांनी केले.तसेच सांगली मिरज एमआयडीसीचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी सत्कार केला.
यावेळी मिरज,कुपवाड,कडेगाव शाळगाव, विटा कार्वे,जत या औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या संघटनेबरोबर विविध विषयांवर चर्चा झाली.
कुपवाड एमआयडीसीसाठी चेंबरचे अध्यक्ष श्री.सतीश मालू यांनी ट्रक टर्मिनस, इएसआय हॉस्पिटल साठी भुखंड,कुपवाड एमआयडीसीच्या विजेचे सब स्टेशन साठी भुखंड आधी प्रश्न मांडले.
विनोद पाटील यांनी मिरज एमआयडीसी मधील रस्ते,विजेचे सब स्टेशन, रमेश आरवाडे यांनी महाराष्ट्र चेंबर च्या वतीने बिनशेती प्रस्तावात येत असलेल्या अडचणी मांडल्या.कार्वे येथील पाणीपुरवठा,विजेची अनियमितता अनियमित,कडेगाव, जत ,येथील उद्योगांचे प्रश्न मांडण्यात आले.मराठा उद्योजक संघटनेच्या वतीने अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक खिडकी योजनेतील सूचना मांडण्यात आल्या.जत येथे नवीन एमआयडीसी स्थापन करणे बाबत चर्चा झाली.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले की,धोरणात्मक निर्णयावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याबरोबर लवकरच बैठक बोलवून सर्व विषय निकाली काढण्यात येतील.स्थानिक प्रश्न तत्काळ सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.जत तालुक्यात नव्याने एमआयडीसी करण्यासाठी जागेची पाहणी करणे बाबत आदेश दिले.
यावेळी कृष्णा व्हॅली चेंबरचे सचिव गुंडूराव एरंडोले,संचालक हरिभाऊ गुरव,मिरज एमआयडीसी असोसिएशनचे सहसचिव अतुल पाटील, व्यवस्थापक गणेश निकम, मराठा उद्योजक फाउंडेशन चे सचिव शंकर रकटे,शरद नलावडे, रामदास चव्हाण,विटा कार्वेचे अध्यक्ष रवींद्र बेंडकळे,संचालक राहुल ढोपे पाटील,कडेगावचे संग्राम देशमुख,जत, शाळगाव औद्योगिक क्षेत्रा औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रास्ताविक रमेश आरवाडे यांनी केले तर आभार विनोद पाटील यांनी मांडले.
यावेळी एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा जाधव,कार्यकारी अभियंता सुनील घोलप,उपअभियंता विकास गायकवाड,क्षेत्र व्यवस्थापक सुभाष आरगे,पवन बोबडे,प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे हरुगडे आदी अधिकारी उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.