लोकसंदेश न्यूज नेटवर्क मुंबई /सातारा
पत्रकार ओंकार पोतदार
💐तुमच्या अस्तित्वाचे सूक्ष्म रूप हृदयी माझ्या वसे, अज्ञानाच्या प्रवासात जगतजननी कायमच सोबती असे, निश्चय आणि निर्धार, परी आधारास तुमच्या पाऊलांचे ठसे चराचरातील पंचतत्वामध्येमध्ये अंश मजला दिसे.💐
🙏निष्पाप निस्वार्थी व्यक्तिमत्व🙏
पद्मावती आई साहेबांना नमस्कार करून सुरुवात करते निष्पाप निस्वार्थी व्यक्तिमत्व असलेले श्री कुलदीप चंद्रराव पिसाळ देशमुख यांना ओझर्डे गाव बाळू काका म्हणून ओळखत होते अतिशय संयमी लोभस नाकासमोर चालणारं, लहान थोरांशी सहज संवाद साधणारं व्यक्तिमत्व.त्यांचे ओझर्डे गावावर शेतीवर आणि कुटुंबावर खूप प्रेम होते ते फलटण वरून येऊन जाऊन शेती करायचे ते गावात आल्यावर आपुलकीने प्रत्येकाची चौकशी केल्याशिवाय पुढे जायचे नाहीत.फलटणवरून फोन केला तरी शेतात गडी माणसे ही हजर असायची, फलटणला होते तरी हळद सर्वात पहिल्यांदा काढून असायची त्यांना उत्कृष्ट शेतकरी म्हणून महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाकडून ऑगस्ट 2017 मध्ये पुरस्कार मिळाला होता. तसेच त्यांच्या वडिलांना म्हणजे कै चंदरराव बंडोबा पिसाळ देशमुख यांना सुद्धा उत्कृष्ट शेतकरी म्हणून पुरस्कार मिळाला होता, त्यांच्या वडिलांनी शेतीला त्याच्या जीवनात अनन्यासाधारण महत्व दिले,फक्त शेती आणि घर एव्हडीच त्यांची दिनचर्या होती त्यावेळी सर्व शेती ते एकटेच पाहायचे त्याच्या मुलांना आणि पुतण्यांना उत्तम शेती कशी करावी याचे बाळकडू ही ह्या सर्वाना त्यांनीच दिले.बाळू काकांची राहणी साधी होती परंतु विचारसरणी उच्च होती,ओझर्डे मध्ये असो वा फलटणमध्ये असो त्यांचा मित्रपरिवार खूप मोठा होता ते सतत मित्रांमध्ये खूप खूष असायचे. ते कुटुंबातील सर्व बहिणींवर सारखेच प्रेम करीत होते बहिणी आल्यानंतर त्यांना खूप आनंद व्हायचा काय काय करू असे त्यांना वाटायचे बहिणींना जाताना हळदीचे पॅकिंग करून ठेवायचे ताज्या भाज्या शेतातून जाऊन घेऊन यायचे. आईप्रमाणे ते काकी आजींनावर पण खूप प्रेम करत होते त्या फलटणला आल्यावर ते खूप खुश असायचे पूर्वीच्या गप्पागोष्टी ही खूप व्हायच्या. काकी आजींचा पण त्यांच्यावर खूप जीव होता. ते स्वतःच्या मुलाप्रमाणे भावांच्या मुलांनावर पण तेव्हडाच जीव लावायचे...स्व.माधवराव नाना, भाऊ आणि आण्णा यांच्या कुटुंबातील एक संस्कारी शिलेदार, मनमिळावू,निर्व्यसनी आणि सर्वांना आपल्यात सामावून घेणारे असे व्यक्तिमहत्व म्हणून त्यांची ओळख मात्र कायमच राहील..त्यांनी त्यांच्या बाबतची सर्व कर्तव्य त्यांना मनापासून निस्वार्थी भावनेने पार पाडली.मी हे केले आहे तू ते कर असे कधीही म्हणायचे नाहीत. गीतेत सांगितल्याप्रमाणे त्यांनी कुठलीही अपेक्षा न करता चांगले कार्य करत गेले,परमेश्वराने त्यांच्याकडून चांगली कार्य करून घेतली...साधारण ६० वर्ष हे काय जगाचा निरोप घेण्याचे वय नाही. नियतीला त्यांचं आपल्यात असणं मान्य नव्हतं असं म्हणावसं वाटतं..परमेश्वराने माझ्या प्रत्येक हाकेला ओ दिली पण यावेळी का दिली नाही कदाचित माझेच काहीतरी चुकले असेल किंवा परमेश्वराच्या मनात दुसरेच काहीतरी असेल पद्मावती आईच्या कृपेने व त्यांनी केलेल्या चांगल्या कर्माने ते जेथे असतील तेथे खूप खुश सुखात राहूद्या हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.🙏
लेखक - उज्ज्वला कुलदीप पिसाळ -देशमूख