शामरावनगर सांगली, वॉड नंबर १८ या भागातील नागरिकांनी प्रशासनाच्या विशेष सूचना
https://youtu.be/EYxOaSM65io?si=qTcjPMYiJs_6QQP7
नागरीकांनी घाबरून न जाता महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनेचे पालन करावे. आरोग्याची काळजी घ्यावी --,मा शुभम गुप्ता आयुक्त
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातील जहीर मोहल्ला, मदरसा मशीद, शामरावनगर सांगली, वॉड नंबर १८ या भागात पाणी पुरवठा करणारी लाईन लिकेज झाल्याने दूषित पाणीपुरवठा होऊन उलटी व हगयण या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत.
या करीत्ता खबरदारीचे उपाय म्हणून महापालिका आरोग्य विभागाकडून या भागात ५ वैदयकीय टिम तयार करण्यात आल्या असून यांच्यामार्फत या भागात घरोघरी जाऊन हगवण, उलटी व इतर तक्रारीच्या आजाराच्या रुग्णांचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहेत. त्याच बरोबर मदरसा मशीद येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन रुग्णांनवर योग्य तो उपचार करण्यात येत आहे. तसेच पाणी पुरवठा विभागाकडून लिंकेज शोधण्याचे काम सुरु आहे तरी भागात नागरीकांना उलटी हगवण या सारख्या तक्रारी असल्यास मदरसा मशीद येथे आरोग्य शिबिर व हनुमाननगर प्राथमिक आरोग्य केंद्रांशी संपर्क साधावा तसेच नागरीकांनी घाबरून न जाता महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनेचे पालन करावे.
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातील जहीर मोहल्ला, मदरसा मशीद, शामरावनगर सांगली, वॉड नंबर १८. या भागात पाईप लाईन लिकेजमुळे दुषित पाणीपुरवठा झाल्याने उलटी व हगवण या आजाराचे रुग्ण आढळून येत असून, या भागातील नागरिकांनी पुढे दिलेल्या सूचनेचे पालन करावे.
नागरिकांनी घ्यावयाची काळजी :-
१) पाणी गाळून उकळून प्यावे.
२) उघडनावरचे अन्नपदार्थ खाऊ नये
३) शिळे अन्नपदार्थ खाऊ नयेत, ताजेगरम अन्न आहारात घ्यावे.
४) जलसंजिवनी, तरल पदार्थ आहारात घ्यावेत.
५) फळे, इतर फळ माज्या, खाद्यपदार्थ खाण्यापुर्वी स्वच्छ पाण्याने धुऊन खावेत.
६) शौचास जाऊन आल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत.
कोणतीही शारीरिक तक्रार जाणविल्यास (मळगळ, भुक न लागणे, उलटी, जुलाब इत्यादी) आरोग्य केंद्र क्रमांक ४, किंवा इतर महापालिका दवाखाने, आरोग्य केंद्र, आयुष्यमान आरोग्यमंदिर मधील वैद्यकिय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार घ्यावा. तसेच मदरसा मशीद शामरावनगर सांगली येथे वैद्यकीय शिबीराचे आयोजित करण्यात आला असून, काही तक्रार असल्यास त्यांच्याशी ही संपर्क साधावा असे आवाहन वैद्यकिय अरोग्याधिकारी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका यांच्यावतीने करण्यात येत आहे.
(डॉ. वैभव पाटील) वैद्यकीय आरोग्याधिकारी
सांगली मिरज कुपवाड शहर महानरगपालिका
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.
_________________________________________________________
संपादकीय...
सांगली बहुत चांगली...
असे बोर्ड व फ्लेक्स सर्व चौका चौकात झळकत असतात मात्र सांगलीच्या उपनगरामध्ये काय परिस्थिती आहे याचं भान या फ्लेक्स झळकवणाऱ्यांना नसावं..
गेली पंधरा ते वीस वर्षे शामराव नगर ही वस्ती वसलेली आहे नियमाप्रमाणे महानगरपालिका याचे सर्व टॅक्सेस कर हे निरंतर वसूल करीतच असते.
मात्र शामराव नगरला एक शाप आहे.. या शापामुळे ही वस्ती अक्षरशः "चिखलवाडी" झालेली आहे या चिखलवाडीसाठी गेल्या पंधरा एक वर्ष झाले येथील नागरिक आंदोलन करतात परंतु गेंड्याच्या कातडीचे असणारे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी कुठली ही सुविधा या भागात दिलेली नाही ..आंदोलन झाल्यानंतर जुजबी चार ट्रक मुरूम टाकला म्हणजे त्याचा सर्व प्रश्न मिटला असं होत नाही... आता या लोकप्रतिनिधींना कोण सांगणार ! ! !
सांगली शहरात लोकवस्ती वाढत असताना लोकांनी आजूबाजूच्या परिसरामध्ये गुंठा दोन गुंठे प्लॉट घेऊन येथे आपलं बस्तान बसवलं परंतु त्यांना शासकीय दरबारी असणारे कोणतेही कागदपत्र जसे प्रमाणपत्र, असतील किंवा इतर सातबारा, असेल हे काहीही त्यांना मिळालेले नाही तसंच या शामराव नगर भागात बशीसारखा भाग असल्यामुळे इथून पाण्याचा निचरा कधीही होत नाही ...या आठ दहा वर्षात आम्ही सर्व आयुक्तांना सांगितलं की, बाबांनो याचा निचरा करण्यासाठी ''कोल्हापूर रोड पासून भोपे गटारी पर्यंत एक मोठी गटार काढली आणि त्यात जर हे पाणी सोडलं तर हे पाणी निश्चितपणाने निघून जाते""(इतकं सोपं असताना)... परंतु कोणताही आयुक्त हे ऐकण्यास तयार नाही.. त्यांना गुंगवणारे अधिकारी उगाचच मलमपट्टी म्हणून एखादी गटार करणे, एखादा जेसीबी लावून नाला उकरणे हे न पटणाऱ्या गोष्टी करत आपला खिसा कसा भरला जाईल याच्याकडे लक्ष देत या भागाची या लोकप्रतिनिधींनी व अधिकाऱ्यानी अक्षरशः दैना केलेली आहे ...महत्त्वाचा भाग म्हणजे लोकसंदेश न्यूजने आठ वर्षाच्या अगोदर याबाबत बातमी लावली होती त्यावेळी सर्व आजूबाजूचे नगरसेवक व आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी आश्वासन दिलं होतं की, या भागाचा आपण काहीतरी कायापालट करू
...परंतु तसं काही झालेलं दिसत नाही सर्वसाधारण आपल्याला ज्या भागातून मतदान होतं त्यांचीच प्रगती करायची का?? आणि विरोधात मतदान होते त्यांना का फंड द्यायचा नाहीं..असं काहीतरी फंडा लोकप्रतिनिधी वापरत असावेत आता आमचा असा समज झालेला आहे... आपला पक्ष, आपलं पद ,आपलं राजकारण हे नक्कीच शामराव नगर परिसरातल्या नागरिकांच्या बोकांडी आलेल् आहे.. आज शामराव नगर परिसरात घरटी एखादी व्यक्ती आजारी आहे... दवाखाने फुल भरून आहेत ...परंतु याबाबतीत शासनाचे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय, आयुक्त महापालिका कार्यालय किंवा लोकप्रतिनिधी ,नगरसेवक म्हणणारे हे कोणीही या ठिकाणी आज मीतीला हजर असल्याने दिसत नाही शामराव नगरच्या लोकांनी स्वतः जुजबी यंत्रणा वापरून स्वतःच्या खर्चाने काही कामे केलेली आहेत याच्यावर ठोस इलाज शासन दरबारी झालेला नाही...
मी स्वतः सांगली लोखंड बाजार म्हणजे भंगार बाजाराचा अध्यक्ष आहे येथे स्क्रॅप वाल्यांच्या दुकानाची संख्या 170 दुकान गाळे आहेत त्या भंगार बाजार मध्ये अक्षरशः पावसाळ्यामध्ये प्रत्येक दुकानात तीन ते चार फूट पाणी उभे राहते त्यामुळे चार पाच महिने ह्या गोरगरीब व्यवसायिकांना आपला उद्योग करता येत नाही याबाबतीत बरीच लेखी तोंडी तक्रारी आम्ही महापालिकेकडे केलेल्या आहेत ..परंतु याच्यातून कोणताही उपाय महापालिकेने स्क्रॅप मार्केट साठी केलेला नाही.. या भागातील साठलेलं पाणी आज देखील निघालेले नाही एक वेळा आयुक्त व त्यांच्या अधिकाऱ्यांना घेऊन येथे दौरा करावा... पावसाळ्याच पाणी आज देखील या भागात साठून आहे यावर काय इलाज करणार की नाही?? असा प्रश्न आता स्क्रॅप मार्केटमधील व्यापारी करीत आहेत ..
माझ्यामते लोकप्रतिनिधींनी ते करायचं नाही असं ठरवलं असावं!!! असू दे ज्याचं त्याचं राजकारण त्यांना लखलाभ असो.... शासन दरबारी लोकांना सुविधा देणे हे त्या शासनाचे कामच आहे आम्ही शामराव नगर परिसरातील सर्व नागरिकांना आव्हान करतो की, इथे लाईट ,पाणी ,घरपट्टी, इतर कर ,कोणी मागायला आलं तर त्याला हाकलून देण्याची व्यवस्था करावी... इतकी चीड या भागात आहे व महापालिका शासकीय यंत्रणा वसुली ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीने सुविधा दिली पाहिजे होती ती दिलेली नाही ..अर्थात यातून काही ऊद्रेक होऊन अधिकाऱ्यांना काही इजा झाली तर त्याची जबाबदारी शामराव नगर नागरिकांवर असणार नाही ...याची कृपया सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी..
सलीम नदाफ
संपादक: लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली.
इंडिया न्यूज पॉवर ऑफ मीडिया. सांगली.
अध्यक्ष ; सांगली लोखंड मार्केट (भंगार बाजार )
व सेंचुरी मार्केट कमिटी. सांगली
8830247886
.