मुख्यमंत्रीपदाच्या शपथेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर · पुण्याच्या रुग्णाला पाच लाखांची मदत

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्रीपदाच्या शपथेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर · पुण्याच्या रुग्णाला पाच लाखांची मदत



दि. ५डिसेंबर, २०२४

लोकसंदेश न्यूज नेटवर्क मुंबई 

मुख्यमंत्रीपदाच्या शपथेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची
पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर
· पुण्याच्या रुग्णाला पाच लाखांची मदत


मुंबई, दि. ५ : मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली.


पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले आहेत.

 

चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती.




   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कारकीर्द व माहिती

फडणवीस, श्री. देवेंद्र गंगाधरराव


जन्म : २२ जुलै, १९७०

 

जन्म ठिकाण  : नागपूर

 

शिक्षण : एलएल.बी. (नागपूर विद्यापीठ तृतीय मेरिट), एम.बी.ए., डिप्लोमा इन प्रोजेक्ट मॅनेजमेंट, डी.एस.ई. बर्लिन, जर्मनी येथून उत्तीर्ण

ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी.

वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती अमृता.

अपत्ये  : एकूण १ (एक मुलगी).

व्यवसाय : सामाजिक कार्य.

पक्ष : भारतीय जनता पक्ष.

मतदार संघ : ५२ - नागपूर (दक्षिण-पश्चिम), जिल्हा - नागपूर.

 

इतर माहिती :

कार्यकारी सदस्य, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी (युनायटेड नेशन्सद्वारा मान्यता प्राप्त संस्था): उपाध्यक्ष, दि सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक (भोसला मिलिटरी स्कूल), उपाध्यक्ष, राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था, अध्यक्ष, स्व. आबाजी थत्ते अनुसंधान संस्थानचे नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, नागपूर; अध्यक्ष, नागपूर जिल्हा बास्केट बॉल संघटना, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्य, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, विविध उपक्रमात सहभाग.

१९८९ वॉर्ड अध्यक्ष, भारतीय जनता पक्ष, धरमपेठ वॉर्ड, नागपूर; १९९० प्रसिद्धी प्रमुख, भाजप, नागपूर (पश्चिम); १९९२-९५ अध्यक्ष, भाजप युवा मोर्चा, नागपूर शहर; १९९५-२००४ उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश, भारतीय जनता युवा मार्चा; २००४ - २००९, २००९ – २०१४ राष्ट्रीय उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा; २००९ भाजप विदर्भ निवडणूक प्रमुख, २०१० महामंत्री, २०१२-२०१४ प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष; ग्लोबल पार्लमेंट या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधीत्व करणारे प्रथम भारतीय लोकप्रतिनिधी; उपाध्यक्ष, ग्लोबल पार्लमेंट फोरम, हाबीतात; १९९२ व १९९७ नागपूर महानगर पालिका सदस्य व १९९७ मध्ये महापौर, महानगरपालिका, नागपूर; १९९८ मे अरइन कौन्सिल पद्धती अंतर्गत महाराष्ट्रातील प्रथम महापौर म्हणून निवड;

१९९९-२००४, २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४ सदस्य, महाराष्ट्र विधानसभा, सदस्य, विधानमंडळ नियम समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, विनंती अर्ज समिती, गृहनिर्माण व नगरविकास स्थायी समिती सदस्य, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण समिती; सदस्य, कार्यकारी परिषद डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ; ओ.बी. सी, नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्राची उत्पन्न मर्यादा वाढविण्यासाठी यशस्वी प्रयत्न; अध्यक्ष, निती आयोग शेती विषयक उच्चाधिकार समिती, भारत सरकार, राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्यावतीने सन २००३ या वर्षाचा महाराष्ट्र विधानसभेतील "उत्कृष्ट संसदपटु" पुरस्कार प्राप्तः 'उत्कृष्ट वक्ता' म्हणून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त; रोटरी क्लबचा "मोस्ट चॅलेंजिंग युथ अॅवार्ड" प्राप्त, हिंदू लॉ विषयात नागपूर विद्यापीठाचा "बी. के. बोस अॅवॉर्ड" प्राप्त; प्रमोद महाजन यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा मुक्तचंद पुणे या संस्थे तर्फे "उत्कृष्ट संसदपटु" पुरस्कार, प्रकाश जोशी यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या राजयोगी नेता पुरस्काराने सन्मानीत; राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कारांनी सन्मानीत.

यशदा, पुणे येथे अर्बन फायनान्सिंग विषयावर व्याख्याने दिली. ३१ ऑक्टोबर २०१४ ते २१ नोव्हेंबर, २०१९ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, २२ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर, २०१९ दुसऱ्यांदा मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, डिसेंबर २०१९ ते जून २०२२ महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते.

३० जून २०२२ रोजी उपमुख्यमंत्री पदाची शपथ, खाती - गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार.

नोव्हेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड, दिनांक ५ डिसेंबर २०२४ रोजी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ.

                        (संदर्भ – १४ वी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय)





माजी मुख्यमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांची माहिती.. 

शिंदे, श्री. एकनाथ संभाजी 

जन्म : ६ मार्च १९६४.

जन्म ठिकाण : अहिर, तालुका - महाबळेश्वर, जिल्हा - सातारा.

शिक्षण : बी.ए.

ज्ञातभाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी.

वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती लता.

अपत्ये : एकूण १ (एक मुलगा).

व्यवसाय : उद्योग व सामाजिक कार्य

पक्ष : शिवसेना

मतदार संघ : १४७ – कोपरी - पाचपाखाडी, जिल्हा - ठाणे.

इतर माहिती :


ठाणे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष, सन १९८६ मध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न आंदोलनात १०० कार्यकर्त्यांसह सक्रीय सहभाग,  ४० दिवस बेल्लारी येथे तुरुंगवास सहन केला, संपूर्ण ठाणे शहर व जिल्ह्यात सामाजिक कार्याचे जाळे निर्माण केले; ठाणे शहरात ओपन आर्ट गॅलरी, सचिन तेंडुलकर मिनी स्टेडियम, इंटरनिटी सुविधा भूखंडावर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक, शहिद हेमंत करकरे क्रीडा संकूल, जॉगिंग पार्क, सेंट्रल लायब्ररी सुरु केली;

आदिवासी प्रभाग मोखाडा, तलासरी व जव्हार येथील आश्रम शाळेत व आरोग्य केंद्रात सकस आहार व आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन करुन गरीब रुग्णांना विनामुल्य औषध वाटप केले; पालघर, बोईसर व सफाळे परिसरात शिवसेने तर्फे एस.एस.सी. विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन, गरीब विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्यांचे वाटप, पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन, बाल नाट्य महोत्सवाचे व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, 'जाणताराजा' नाटकाचे अत्यल्पदरात आयोजन, अध्यक्ष, ठाणे जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन; उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अॅथलेटिक्स संघटना, पूरग्रस्तांना मदत

,
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई /सांगली.
______________________________________

बातमीचे या भागाचे प्रायोजक आहेत. 

महाराष्ट्र कार ॲक्सेसरीज.. सर्व प्रकारच्या कार्सचे ॲक्सेसरीजचे रिटेल व होलसेल सप्लायर्स..

 महाराष्ट्र कार ॲक्सेसरीज ,महाराष्ट्र स्क्रॅप जवळ ,100 फुटी रोड ,सांगली.

 फ्रेंचाईसाठी संपर्क करा:  "छोटे भांडवल" "मोठा नफा"

98505163555
751 751 1185


__________________________________________________________________________________