लोकसंदेश न्यूज नेटवर्क
सी सी टीव्हीसाठी स्वतंत्र अनुदान मिळावे
रावसाहेब पाटील
अध्यक्ष- सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघ सांगली.
सांगली - २१ ऑगस्ट २०२४ रोजी च्या परिपत्रकानुसार प्रत्येक शाळेत सी. सी. टीव्ही. कॅमेरे बसविणे बंधनकारक केले आहे. मागील काही द०िवसापासून शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या सोबत अनुचित प्रकार घडल्याचे समोर आलेले आहे. सबंधित शाळांमध्ये विकृत मानासिकत्याच्या कर्मचाऱ्यांनी मुलींची छेडछाड करून त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सर्व गोष्टी शैक्षणिक विभागाला काळिमा फासणारे आहेत. प्रत्येक शाळेत सी. सी टी. व्ही. कॅमेरे बसवल्यास अशा गैरप्रकारांना व वाईट कृत्यांना आळा बसेल अशी अपेक्षा ठेवून सरकारने हा निर्णय घेतलेला आहे.
सरकारच्या द०ष्टिकोणातून घेतलेला हा स्तुत्य असला तरी शिक्षण संस्थांच्या दृष्टिकोणातून हा निर्णय खर्चिक आहे. ज्या शठैक्षणिक संस्थांचे आर्थिक परिस्थिती चांगली आहे. अशा स०स्थांनी शाळांच्या परिसरात सी.सी.टीव्ही. कॅमेरले बसवळून अनधिकृत व्यक्तीच्या प्रवेशाला पायबंद घातलेला आहे. पण २०२५ वर्षात सुरु होणाऱ्याण दहावी व बारावीच्या परिक्षा केंद्रातील प्रत्येक वर्गात सी. सी. टीव्ही. कॅमेरे बसवावळे लागणार आहेत. एखाद्या परीक्षा केंद्रावर अधिक विद्यार्थ्यांचे नंबर आलले असतील तर त्या संस्थेच्या प्रत्येक वर्गात कॅमेरे बसवावे लागणार आहेत. म्हणजेच त्यांच्याही खर्चावर अधिक ताण येणार आहे.
ज्या शिक्षण सम्या टप्पा अनुदानित आहेत किंवा ज्याची कनिष्ठ महाविद्यालये टप्पा अनुदानाया यादीत आहेत अशा संस्थांना हा खर्च करणे अवघड झालेले आहे. ज्या संस्था अनुदानित आहेत त्यांना फक्त ५% वेतनेत्तर अनुदान मिळते. हे वेतनेतृतर अनदान घरपट्टी, पाणी वीज व मालमत्तेची दुरुस्ती यावरच खर्च होतो. त्या मुळे अशा संस्था सी. सी. टीव्ही. कॅमेरे बसवण्यास तयार नाहीत. जर त्यांना स्वतंत्र वळेतनेत्तर अनुदान मिळाले तर, स्वखुशीने या संस्था तयार होतील म्हणून सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे श्री. विनोद पाटोळे, शिवपुत्र अरबोळे, श्री. आर. एस. चोपडे, श्री. नितीन खाडीलकर, श्री. अरुण दांडेकर, श्री. शशिकांत राजोबा, श्री. शिवपुत्र अरबोळे, श्री. एस. के. होर्तीकर, श्री. वैभव गुरव यांनी हि माहिती दिली आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.